Breaking News

217 कोटींच्या विकास कामांना मंजुरी

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले असून त्यांची मुदत 28 फेब्रवारीला संपत आहे. मुदत संपत असताना स्थायी समितीने विकास कामांना मंजुरी देण्याचा धडाका लावला आहे. कोटीची कोटी उड्डाणे घेतली जात आहे. स्थायी समितीने शहरातील विकासकामांसाठी तब्बल 217 कोटी 91 लाख 87 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. ग प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 4 कोटी 8 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास, से.क्र. 4,6,9,11 परिसरातील ठिकठिकाणचे रस्ते बी.बी.एम. व खडीमुरुमाचे रस्ते विकसित करण्यासाठी येणार्‍या सुमारे 1 कोटी 23 लाख 39 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 
पिंपरी वाघेरे येथील आरक्षण क्र. 173 येथे सिमाभिंत बांधण्यासाठी येणार्‍या सुमारे 1 कोटी 49 लाख 92 हजार रुपयांच्या खर्चास, फुगेवाडीमधील लोकमान्य टिळक शाळेच्या जुन्य इमारतीत फेरफार करुन नविन शाळा इमारत बांधणे व स्थापत्य विषय कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 4 कोटी 2 लाख 72 हजार रुपयांच्या खर्चास, वाकड आरक्षण क्र. 4/11 जकात नाक्याचे जागेसाठी सिमाभिंत घालण्यासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 61 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी, किवळे रस्त्यावर बी.आर.टी.एस बस स्टेशन जवळील बस डाँकिंगच्या जागेचे मजबुतीकरण करण्यासाठी येणार्‍या सुमारे 3 कोटी 68 लाख 30 हजार रुपयांच्या खर्चास, पुणे-नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते पुणे आळंदी रस्त्यापर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठी येणार्‍या सुमारे 50 कोटी 94 लाख 98 हजार रुपयांच्या खर्चास, च-होली डुडुळगाव येथील स.क्र.134 ते 186 विकास आराखड्यातील 18 मिटर रस्ता विकसित करण्यासाठी येणार्‍या सुमारे 23 कोटी 93 लाख 63 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 
चिंचवडेनगरमध्ये बिजलीनगर अंरडपास करण्यासाठी येणार्‍या सुमारे 13 कोटी 21 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चास, चिखली से. क्र. 17 व 19 येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृहप्रकल्पामध्ये विविध आरक्षणे विकसित करण्यासाठी येणार्‍या सुमारे 9 कोटी 85 लाख 51 हजार रुपयांच्या खर्चास, देहू कमान ते झेंडेमळा रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 12 कोटी 55 लाख 96 हजार रुपयांच्या खर्चास, चर्‍होली येथील स.नं. 458 ते 404 (पठारे मळा) येथील 18 मीटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठी येणार्‍या सुमारे 9 कोटी 73 लाख 98 हजार रुपयांच्या खर्चास, सांगवी किवळे रस्त्यावर पार्क स्ट्रिट समोर सबवे बांधण्यासाठी येणार्‍या सुमारे 8 कोटी 59 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.