पुणे : पीएमपीच्या ताफ्यात 200 मिडीबस 8 मार्चपासून टप्प्याटप्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना क ाही नव्या मार्गांवर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी खरेदी केलेल्या 200 मिडीबसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या बसची आसनक्षमता 32 आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर या बस धावणार आहेत. त्यासाठी 26 मार्ग पीएमपीने निश्चित केले आहेत. या सर्व बस डिझेलवर धावणार्या आहेत. पहिल्या टप्प्यात 60 बस येणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 मार्चपासून त्यांची नोंदणी होईल. तर आठ मार्चपासून टप्प्याटप्प्याने या बस मार्गावर धावतील. त्यामुळे 8 मार्चपासून प्रवाशांना नव्या बस उपलब्ध होणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे 2050 बस आहेत. त्यातील सुमारे 150 बसचे आयुर्मान संपलेले आहे. तरीही त्यांची दुरुस्ती करून त्या मार्गावर सोडल्या जात आहेत. बंद पडणार्या बसची संख्या वाढत असल्यामुळे पीएमपीच्या सध्या 1450 ते 1500 बस मार्गांवर धावत आहेत. दररोज सुमारे 40-50 बस बंद पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या ताफ्यात बस घेण्याचा निर्णय ऑक्टोबर 2016 मध्ये झाला. पालकमंत्री गिरीश बापट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्या बाबतची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे खरेदी प्रक्रिया थांबली. गेल्या वर्षातही बस खरेदीसाठी केवळ कागदोपत्री प्रक्रिया झाली. मात्र, दोन्ही महापालिकांच्या अर्थसंकल्पातून पुण्याने 120 आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेने 80, अशी 200 बसची खरेदी झाली. या बस पीएमपीच्या ताफ्यात दोन महिन्यांपूर्वीच येणे अपेक्षित होते. मात्र, त्याला विलंब झाला आहे. या पार्श्वभूमीवर 800 बसच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर, 550 वातानुकूलित (एसी) बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी घेतला होता. तर तेजस्विनी बस’ची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने मनात आणले, तर येत्या तीन महिन्यात 1550 बस पीएमपीच्या ताफ्यात येऊ शकतात.
पीएमपीच्या ताफ्यात 200 मिनीबस प्रशासनाने उदारता दाखविल्यास तीन महिन्यात 1550 बस पीएमपीच्या ताफ्यात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:45
Rating: 5