Breaking News

19 कोटींच्या विकास कामाला स्थायी समितीची मंजुरी

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 19 कोटी 41 लाख 96 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. शहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत विठ्ठलनगर येथील प्रकल्पामधील इमारतीची (-8,-9) मध्ये स्थापत्य विद्युत, पाणीपुरवठा व जलनिःस्सारण विषयक कामांची दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 2 कोटी 7 लाख 72 हजार रुपयांच्या खर्चास, काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटीएस रस्त्यावरील विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदलेला रस्ता व पदपथ यांचे चर पूर्ववत करण्यासाठी येणा-या सुमारे 64 लाख 77 हजार रुपयांच्या खर्चास, टेल्को रस्त्यावरील थरमॅक्स चौक ते केएसबी चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरी करणे व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 4 कोटी 20 लाख 19 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. 

दापोडीतील बुद्धविहार शेजारील मोकळया जागेत उद्यान विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे 71 लाख 68 हजार रुपयांच्या खर्चास, बैठकीत थेरगाव परिसरातील नाल्यांमधील मलनिःस्सारण नलिकांची सुधारणा कामे करणे इतर अनुषांगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 40 लाख 46 हजार रुपयांच्या खर्चास, चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत आहेरनगर गिरिजा हौ. सोसायटी व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरीत ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या सुमारे 43 लाख 13 हजार रुपयांच्या खर्चास, आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गंत आकुर्डी गावठाण, गंगानगर परिसरात जलनिःस्सारण नलिका सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 34 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास, दापोडी पंपीग स्टेशन अंतर्गत येणा-या जुन्या मलनिःस्सारण नलिका आवश्यक त्याठिकाणी बदलण्यासाठी येणा-या सुमारे 36 लाख 80 हजार रुपयांच्या खर्चास, दापोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्यासाठी येणार्‍या सुमारे 2 कोटी 7 लाख 4 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. र भोसरी, गवळीनगरमधील गवळी बंगला ते गवळी उद्यानपर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे 53 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास, कासारवाडी 40 द.ल.लि. मैलाशुद्धीकरण केंद्र टप्पा 1 चे चालन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे 2 कोटी 5 लाख 15 हजार रुपयांच्या खर्चास, फुगेवाडी स्मशान भूमी कडेचा डीपी रस्ता करण्यासाठी येणा-या सुमारे 44 लाख 48 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. 
मनपाच्या मैलाशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनमधील वाढलेल्या वीज भारानुसार उर्जा बचतीकामी ट्रान्सफॉर्मर बसविणे व आवश्यक विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 28 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या मैलाशुद्धीकरण केंद्रे व पंपींग स्टेशनमध्ये अचानकपणे वीजपुरवठा खंडीत झाल्यास विद्युत पूर्ववत करण्यासाठी येणा-या सुमारे 41 लाख 48 जार रुपयांच्या खर्चास, पडवळनगर, पवारनगर परिसरात दुषित पाणी तक्रार निवारण करणेकामी नवीन पाणीपुरवठा नलिका पुरविणे व टाकण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 18 हजार रुपयांच्या खर्चास, बैठकीत चिखली येथील मोरे वस्ती परीसरात टॉवर लाईन व नवीन विकसित भागात आवश्यकतेनुसार पाईपलाईन टाकणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 30 लाख रुपयांच्या खर्चास, 3 च-होली डुडुळगाव व येथील स्मशानभूमीची सुधारणा व स्थापत्य विषयक कामे रण्यासाठी येणा-या सुमारे 2 कोटी 8 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.