Breaking News

पोलीस निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या


धुळे : धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रामेशसिंग परदेशी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. रामेशसिंग परदेशी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करुन शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथून ते घरी परतले. त्यांनतर रात्री उशिरा बाहेर फिरण्यासाठी गेले. तासाभरात परत आल्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून त्यांची पत्नी खोलीत धावत गेली. या वेळी ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांची किंकाळी आणि गोळीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे धावत परदेशी यांच्या बंगल्यात धावत आले. त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकार्‍याकडे सांगितला. या घटनेनंतर सर्व अधिकारी व कर्मचारी त्याच्या बंगल्यावर आले. तपासणीसाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. परदेशी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.