फिरते लोक न्यायालय विधी साक्षरता व ए. डी आर. शिबीर संपन्न
कर्जत (प्रतिनिधी)/- कुळधरण येथे फिरते लोक न्यायालय विधी साक्षरता व ए. डी आर. शिबीर संपन्न झाले. उच्च न्यायालय मुंबई, जिल्हा विधी व सेवा समिती, तालुका विधी सेवा समिती व कर्जत बार असो. याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे कर्जत येथील न्यायालयाचे न्यायाधीश डी. जे. पाटील याचे अध्यक्षतेखाली फिरते लोक न्यायालय आयोजित करण्यात आले होते. यावेळी कर्जत बार असो. चे अध्यक्ष अॅड बी. बी. बागल यांनी प्रास्ताविक करताना न्याय आपल्या दारी या शासनाच्या संकल्पनेची माहिती दिली. यावेळी अॅड बी सी शेळके, अॅड एस एम गुंजाळ, अॅड सौ साधना सुपेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सह. दिवाणी न्यायाधीश डी. जे. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून लोकन्यायालय, मध्यस्थी जागृती अभियान, तडजोड अशा प्रकारची शिबिरे घेण्यामागे पक्षकारावर कोणताही दबाव अथवा जबरदस्ती करण्याचा हेतू नसून फक्त प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्याचा मार्ग आहे. असे सांगत अशा प्रकारे प्रकरणे मिटविल्यामुळे वादी, प्रतिवादी यांचा वेळ पैसा याची बचत होऊन मानसिक त्रासापासून सुटका होते, प्रत्येक पक्षकार न्यायालयात न्याय मिळविण्यासाठी आलेला असतो. मात्र जेव्हा निकाल लागतो, तेव्हा एका पक्षकाराचे मन दुखावले जाते. हे होऊ नये यासाठी प्रत्येकाने सामोपचाराने मध्यस्थी केंद्राद्वारे प्रकरणे मिटवावीत व एकमेकांची माने दुखावली जाणार नाहीत. याची काळजी घेताना गैरसमजुतीमुळे निर्माण झालेले शत्रुत्व यातून नष्ट होईल असे म्हटले. या कार्यक्रमास त्रिमूर्ती समुहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, राहुल पाटील, कुळधरणचे सरपंच अशोक जगताप, पोलीस पाटील समीर जगताप, कर्जत वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड सुरेश पोटरे, अॅड दिपक भंडारी, अॅड जी बी नेवसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड व्ही आर मोगल यांनी केले