पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आहेर यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर
त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात उत्कृष्ट महाविद्यालयासह 15 विविध पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयात 50 आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आयोजीत केली आहेत. राष्ट्रीय मानांकनात या महाविद्यालयास 101150 क्रमांक मिळविला होता. महाविद्यालयात कँक्टस गार्डन , बोटनिकल गार्डन , डीजीटल मुझियम ,पाणी पुनर्भरण ,सौरऊर्जा प्रकल्प, बायोगँस प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प, महाविद्यालयीन विदयार्थ्यांना ओपन जिम,असे महत्वपुणँ प्रकल्प त्यांनी राबवले आहेत.महाविद्यालयात विद्याथॉना केन्द्रबिंदु मानुन युवा साहीत्य संमेलन,आदि विषयावर चर्चासत्रे ,पञकार, साहीत्यीक यांच्याशी संवाद, यामुळे 4 वर्षात 75 विदयार्थी गुणवत्ता यादीत आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी 14 विविध विषयांचे प्रमाणपञ अभ्यासक्रम सुरु केले आहेत.रस्ता सुरक्षा अभियान, निर्भय कन्या अभियान, जागर जाणीवांचा या माध्यमातुन महाविद्यालयाला अनेक पुरस्कार मिळवुन दिले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, सचिव जी डी खानदेशे, सहसचिव अँड.दिपालक्ष्मी म्हसे, सभापती राहुल झावरे यांनी अभिनंदन केले आहे.