सोनई ग्रामपंचायत प्रभाग क्र,2 ची पोट निवडणूक जाहीर.
5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी18 पर्यंत उमेदवारी अर्ज भरणे, 12रोजी अर्जाची छाननी करणे, 15 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणे,16 ते 23 या काळात प्रचार करणे मतदान 25 रोजी होऊन मतमोजणी 26 तारखेला होणार आहे. ही जागा अनुसूचित जाती साठी राखीव असून, निवडून येणाऱ्या सदस्याला दोन वर्षासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे क्रांतिकारी पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहे. मागील निवडणुकीत क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार सुरेखा अशोक साळवे, अपक्ष सचिन पवार, व संतोष तेलोरे यांच्यात लढत होऊन साळवे विजयी झाल्या होत्या. त्यात पवार यांनी 443 मते घेवुन लोकप्रिय ठरले होते. आता या पोटनिवडणुकीत कोण-कोण उतरणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान माजी.आ.शंकरराव गडाख हे कोणाला उमेदवारी देणार हे देखील लक्षवेधी ठरणार आहे.