व्यंगचित्रसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्था कार्टूनिस्ट कंबाइन आयोजित हास्यदर्शन २०१८ हे व्यंगचित्रकारांचे संमेलन २० व २१ जानेवारी रोजी ज्ञानराज सभागृह, ठाणे येथे होत आहे. उदघाटक ज्येष्ट चित्रकार सुहास बहुलकर , ज्येष्ट अभिनेते जयंत सावरकर , रवींद्र प्रभुदेसाई हे असून स्वागताध्य्क्ष मा. एकनाथ शिंदे, नगरसेविका सौ.रुचिरा मोरे हे आहेत. ४०० व्यगंचित्रकारांची व्यंगचित्रे या संमेलनात प्रदर्शित होत आहेत त्यात संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचेही व्यंगचित्रांचा समावेश असून त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिके संमेलनस्थळी होणार आहेत . या संमेलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे (कलारसिक व श्रेष्ठ छायाचित्रकार), आमदार संजयजी केळकर, मिनाक्षी शिंदे (महापौर ठाणे म. न .पा .) हे मान्यवर उपस्तित राहणार आहेत.. नामवंत व्यंगचित्रकार आणि त्यांची व्यंगचित्रे पाहण्याची संधी या निमित्त उपलब्ध झाली आहे. या संमेलनात व्यंगचित्र कार्यशाळा , व्यंगचित्र स्पर्धा , परिसंवाद , व्यंगचित्र प्रात्यक्षिके , तुमचे व्यंगचित्र तुमचे समोर , शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा असे भरगच्च कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत.
संगमनेरच्या अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्रांचे हास्यदर्शन संमेलनात प्रात्यक्षिक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:45
Rating: 5