Breaking News

मार्केट यार्ड रस्त्यांसाठी गुरूवारी रास्ता रोको


कोळपेवाडी पंप ते टाकळी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील व्यापारी व नागरिकांनी मागणी करूनही रस्ता होत नाही.

तेंव्हा समता पतसंस्था संस्थापक काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यापारी व निवारा सुभद्रानगर, खडकी, ओमनगर या भागातील नागरिक गुरुवार दि.१८ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

हा रस्ता कांक्रीटीकरण करून दिल्यास समता पतसंस्था व व्यापारी महासंघ लोकसहभागातुन सुशोभीकरण करून देण्यास तयार आहे. असेही आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे.