राशिनला विद्यार्थ्यांनी गिरवले वृत्तलेखनाचे धडे
या उपक्रमात वृत्तपत्र प्रतिनिधी विश्वास रेणूकर, संपादक महादेव सायकर, किशोर कांबळे यांनी बातमी लेखन कौशल्यावर मार्गदर्शन केले. बातमीचे शीर्षक, डेटलाईन, लिड तसेच बातमीतील मजकूर लिहिण्यासाठी उपयुक्त बारकावे विद्यार्थ्यांसमोर मांडले. वृत्तपत्रीय भाषा, बातमीची रचना, कार्यालयीन कामकाज आदी मुद्द्यांवर विश्लेषण करण्यात आले. उपप्राचार्य जोत्स्ना जोगदंड, पर्यवेक्षक हनुमंत लोंढे, भानुदास भोंडवे, मझहर सय्यद, अश्वीनी धांडे, राजकुमार चौरे आदी उपस्थित होते. शिक्षीका मंगल त्रंबके यांनी प्रास्ताविकात दहावीच्या मराठी विषयात वृत्तलेखनावर आधारीत ५ गुण आहेत. त्याचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.सुत्रसंचालन मंगल त्रंबके यांनी केले.संगिता विसापुरे यांनी आभार मानले
