मुंबई, विद्यार्थ्यांना, वाहन चालकांना तसेच इंधनाचा वापर करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इंधन बचत करण्याचे प्रशिक्षण देऊन इंधन बचतीसाठी जनजागृती करणे, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च असोसिएशन (पी सी आर ए) या संस्थेद्वारे इंधन बचतीसाठी जनजागृती करण्यासंदर्भात वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येणार आहे. सक्षम संरक्षण महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन दि. 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2018 या दरम्यान संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ‘इंधन संरक्षण की जिम्मेदारी, जन गण की भागीदारी’ अशी आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडले. यावेळी वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता तसेच विविध तेल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
इंधनाबद्दल जागृतीसाठी आयोजित संरक्षण क्षमता महोत्सवाचे उद्घाटन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:30
Rating: 5