Breaking News

आपले वाद लोकन्यायालयाच्या माध्यमातून गावातच मिटले पाहीजेत : न्यायाधीश ए एम मुजावर


जामखेड/ ता.प्रतिनिधी /- आपले वाद न्यायालयात न येता हे लोकन्यायालयाच्या माध्यमातून गावातच मिटले पाहीजेत. त्यामुळे त्यासाठी कायद्याची माहिती घेऊन आपला वेळ आणि पैसा वाचवा असा सल्ला न्यायाधीश ए. एम. मुजावर यांनी पाटोदा येथिल ग्रामस्थांना दिला. 
तालुका विधी सेवा समिती व जामखेड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि २४ जानेवारी रोजी सकाळी आकरा वाजता तालुक्यातील पाटोदा गरडाचे या ठिकाणी फिरत्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष व न्यायाधीश ए. एम. मुजावर बोलत होते. या वेळी सह दिवाणीन्यायाधीश पी व्ही सपकाळ, वकील संघाचे अध्यक्ष अॅड हर्षल डोके, अॅड अल्लाउद्दीन शेख, अॅड शमाहाजी कादर, अॅड पी एम कात्रजकर, महारूद्र नागरगोजे, जे एम सय्यद, अमोल जगताप, अमिर पठाण, मोहन कारंडे, अॅड कोरे, अॅड ए.ए.शेख, पारे वकील, संग्राम पोले, अभय मुरूमकर, जी.एस.पाटील, पाटोदा गावचे सरपंच प्रा. अर्चना सिध्दार्थ थोरात, उपसरपंच महादेव कदम, माजी उपसरपंच व ग्रा. प. सदस्य गफ्फार पठाण, माजी सरपंच समिरभाई पठाण, दिनकर टापरे, चॉंदबी मद्देखा पठाण, दादासाहेब राऊत, जाकीर शेख , अरुण थोरात, जगन्नाथ मोरे, ग्रामविकास अधिकारी महेश जगताप, ह.भ. प. भाकरे महाराज, सिध्दार्थ थोरात, अशोक शिकारे, गहिनीनाथ कीरदात सह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.