हाळगावला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय
याबाबत शासन निर्णय घेताना राज्य सरकारने उपलब्ध जागेचा विचार करून हाळगावला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातच नव्हे तर देशातील अवर्षन प्रवण व दुर्गम भागात अशी नवी संस्था स्थापन करणे ही बाब सर्वांसाठी न्याय देणारी , विकासास पुरक ठरणारी व समतोल क्षेत्रीय विकास साध्य करणारी असल्याने वरील बाबींचा सर्वंकष पुर्नविचार करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय २८ जुन २०१६ रोजी मंत्रीमंडळ बैठकीत घेतला . त्यानंतर ५जूलै २०१६ रोजी शासन निर्णयही झाला . दरम्यान या शासन निर्णयाविरूध्द औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर खंडपीठाच्या ५ जूलै २०१७ रोजीच्या आदेशानूसार शासनाचा ५ जूलै २०१६ चा शासन निर्णय अस्तित्वात राहिला नाही. यानंतर राज्य मंत्रीमंडळाच्या २१ डिसेंबर २०१७ रोजीच्या बैठकीत हाळगावला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला. या विभागाचे सहसचिव दे.आ.गावडे यांनी याबाबत शासन निर्णय प्रसिध्द केला आहे
