Breaking News

८१ लाख निधीच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भुमीपुजन.


पाथर्डी/प्रतिनिधी/- तालुक्यातील माणिकदौंडी येथे शुक्रवार,२६ जानेवारी २०१८ रोजी ८१ लाख निधीच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भुमीपुजन आणि वीस लाख रुपये निधीचा पशुवैद्यकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, माणिकदौंडी व परीसरातील विविध प्रश्नसाठी तसेच विकासकामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न असून माणिकदौंडी परीसरातील वाड्या,वस्त्या व लमाणतांडे येथे पिण्याचे पाणी, रस्ता व जलसंधारणाची कामे प्राधान्याने मार्गी लावले जातील. तर पंचायत समितीचे सदस्य सुनिल ओव्हळ यांनी बोलताना म्हटले की, माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला थेट पंचायत समितीमधे काम करण्याची संधी राजभाऊनी दिली. तरी ही संधी मोलाची असुन येणाऱ्या काळात संधीचे सोने करून परीसरातील गावांचा विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीत राहील.

कार्यक्रमासाठी ह.भ.प.छगन महाराज मालुसरे,जिल्हा परीषदेच्या सदस्या ललिता शिरसाठ, राहुल राजळे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, सरपंच प्रल्हाद राठोड, रावसाहेब मोरे, विजय मंडलेचा, गोकुळ दौंड,नवनाथ चितळे, सुंदर चव्हाण, बाबासाहेब बोरसे, भाऊसाहेब जिवडे, चाँद मौलाना, शिवाजी मोहीते, शिवनाथ मोरे,दिनकर गर्जे,काकासाहेब शिंदे, सुभाष केकाण, राधाकिसन कर्डीले, नवनाथ चव्हाण, उद्धव माने, आलमगीर पठाण, पोपट पठाण , मधुकर धावड, अशोक कांबळे, संतोष आंधळे आदी जण उपस्थीत होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल ओव्हळ यांनी तर सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी तर समीर पठाण यांनी आभार मानले.