Breaking News

पाचुंदा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

बालाजी देडगाव / प्रतिनिधी /- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक बिराजी वाघमोडे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिवाजी वाघमोडे, उपसरपंच आदिनाथ माने, सेवा संस्थेचे अध्यक्ष साहेबराव होंडे उपस्थित होते . यावेळी विद्यार्थ्यांनी विविध हिंदी, मराठी गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका सादर केल्या. 



तसेच विविध देशभक्तीपर, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना जखमी झालेले व दोन दहशतवाद्यांना ठार करणारे पाचुंदा गावचे सुपुत्र मेजर कृष्णा होंडे यांची उपस्थिती होय. यावेळी पोलीस पाटील उमाजी होंडे, माणिकराव होंडे, पोपटराव वाघमोडे, उमेश हंडाळ, बाबासाहेब गोफणे, नारायण वाघमोडे, एकनाथ होंडे, भारत चंद, प्रदीप महाराज वाघमोडे , कोकरे, खरात आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी आपल्या चिमुकल्यांचे कौतुक करताना पालकांनी बक्षिसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक उत्तम माळी यांनी केले. तर सूत्रसंचालन सुरेश तळेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता पवार, भाऊसाहेब सावंत, संजय पुंडे, भास्कर तांबे, संजय शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सुनील पठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.