मुंबई : महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 अंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्यासाठी मुद्रांक शुल्क तसेच राज्य सरकारच्या विविध कर सवलती देण्यात येतात. त्या अनुषंगाने ऑक्टोबर 2016 मध्ये महसूल व वन विभागाने काढलेल्या आदेशात भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीबाबतचा उल्लेख राहून गेल्याने नवीन पर्यटन उद्योग सुरु करण्यासाठी या सवलतींचा लाभ मिळत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी पाठपुरावा केल्यामुळे महसूल व वनविभागाने पूर्वीचा आदेश रद्द करुन भाडेपट्ट्याचा समावेश करुन नवीन आदेश काढला आहे. याबाबत महसूल व वन विभागाने 29 ऑक्टोबर 2016 रोजी मुद्रांक शुल्काच्या माफीबाबतचे आदेश काढले होते. तथापि, या आदेशामध्ये नवीन पर्यटन उद्योग सुरू करण्यासाठी भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीबाबत उल्लेख नसल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) अनेक प्रकल्पांना मुद्रांक शुल्क माफीचा लाभ मिळत नव्हता. यामुळे नवीन उद्योग सुरू करण्यात अडचणी येत होत्या.
आता भाडेपट्टयाच्या जमिनीवरही नवीन पर्यटन उद्योगासाठी मुद्रांक शुल्कमाफी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:30
Rating: 5