प्रवरानगर प्रतिनिधी :- लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ यांची सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाली. या विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. डॉ. रसाळ ही निवड पुढील पाच वर्षांसाठी आहे. या निवडीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, भारत घोगरे डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ. प्रदीप दिघे, प्रा. दत्तात्रय थोरात, प्रा. छाया गलांडे आदींनी डॉ. रसाळ यांचे अभिनंदन केले.
पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. रामचंद्र रसाळ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:45
Rating: 5