नवी दिल्ली : इटलीच्या एका न्यायालयाने बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड या व्हीव्हीआयपींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीतील घोटाळयाप्रकरणी सोमवारी दोघांना निर्दोष ठरवले. लिओनार्दोचे दोन माजी अधिकारी जुसपे ओरसी आणि ब्रूनो यांना निर्दोष मुक्त केले. जुसपे ओरसी आणि ब्रूनो हे प्रमुख आरोपी असल्याचे बोलले जात आहे. पुराव्यांअभावी कोर्टाकडून आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, सरकारी संरक्षण समूहाचे माजी प्रमुख आणि ऑगस्टा वेस्टलँडच्या हेलिकॉप्टर यूनिटचे प्रमुख राहिलेल्या ब्रूनो यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. डिसेंबर 2016 मध्ये इटलीच्या सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले होते.
ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी भारताला धक्का
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:04
Rating: 5