चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनविभागाने प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली आहे. पूर्वी 700 ते 1000 असणारे प्रवेश शुल्क आता विकेंडला शनिवारी आणि रविवारी 8 हजार रुपये करण्यात आलं आहे. तर इतर दिवशी 4 हजार रुपये एवढं शुल्क ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नाहीत. या दर वाढीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट होण्याचीही शक्यता आहे. या व्याघ्र प्रकल्पात जिप्सिचे चार्जेस 2200 रुपये आहे आणि गाईडचे 300 रुपये म्हणजेच काय तर विकेंडला ताडोबात व्याघ्र दर्शनासाठी 10,500 रुपये लागतील. तर 120 दिवस आधीच आनलाईन बुकिंग करण्याची सोयही सुरु करण्यात आली आहे. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवेश शुल्कात वाढ केल्याने सर्वसामान्यांनी पर्यंटनासाठी येऊच नये का असा सवालही व्याघ्रप्रेमींकडून विचारण्यात येतो आहे.
ताडोबाची सफर महागली
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:08
Rating: 5