संगमनेर/प्रतिनिधी - महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सामाजिक वास्तव्य उलगडणा-या विविध एकांककिकांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या एकांकिकांमध्ये 'अतिक्रमण' व 'डील' या शाहू करंडक विजेत्या एकांककिकांचा समावेश आहे. बाप व मुलाच्या प्रेमळ नात्यातून विद्यार्थ्यांना भावनिक केले. 'बाप' व 'मोरुची मावशी' या विनोदी एकांकिकेत विडंबनातून दिलखुलास विनोदाची बरसात केली. 'तांडव' या एकांकिकेत रुढी व परंपरा याची समाजात रुतलेली चाके कशा पध्दतीने आपण बाहेर काढू शकतो, याचे सादरीकरण केले. 'कॉलेज कट्टा' व 'प्यार हमें किस मोड पे ले आया' या एकांकिकेत प्रेमाच्या डोहात पडून विद्यार्थी शैक्षणिक नुकसान कसे करुन घेतात, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या एकांकिकांचे दिग्दर्शन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक मंडळाचे समन्वयक डॉ. उमेश जगदाळे व प्रा. बी. एम. पालवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. लिंबेकर अशोक, डॉ. जितेंद्र पाटील व डॉ. हनुमंत कुरकूटे तसेच सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य व प्राध्यापक वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दिला.
‘संगमनेर’मध्ये झाले एकांककिकांचे सादरीकरण उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:58
Rating: 5