वेगळेपण कळल्यास व्यक्तिमत्व विकासाच्या धड्यांची गरज नाही : शिंदे
प्रवरा ग्रामीण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज होते. प्रास्तविक डॉ. व्ही. ए. खर्डे यांनी केले. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःचे ‘सॉंट अनालिसिस’ करायला शिकले पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. त्याला फक्त ‘स्पार्क’ होण्याची गरज आहे. वेगळेपण कळेल, तेव्हा आयुष्य संदर होईल. मनातील न्यूनगंड बाजूला ठेवा. शिक्षण हे व्यक्तिमत्व बदलासाठी आहे का, शिक्षणामधून विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते पोहचतेय का, फक्त औपचारिकता म्हणून शिकवितोय का, याचा विचार होणे गरजेचे आहे.
औपचारिकतेच्या पुढे गेल्याशिवाय शिक्षण आनंदी होणार नाही. शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हक्काची व्यासपीठ बनली पाहिजे. आपल्याकडे प्रचंड ताकद आहे, त्याची जाणीव झाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी अंतर्मनात डोकून पाहिले पाहिजे. जग झपाट्याने पुढे चालले आहे. कोणतीही परिस्थिती विकासाला आडवी येऊ शकत नाही. कारण कोणतीही स्पर्धा पहिले येण्यासाठी असण्यापेक्षा जिंकण्यासाठी असली पाहिजे. रामायण-महाभारतातील तसेच चालू घडामोडीवर व दैनंदिन जीवनातील अनेक घटना व प्रसंगाची उदाहरणे त्यांनी देऊन विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. आर. वाळुंज म्हणाले, अशा प्रकारच्या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन अशा
कार्यशाळा आयोजित केल्या जातात. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. ए. ए. लांडगे, उपप्राचार्य डॉ. ए. ए. विखे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. आर.ए. दिघे, डॉ.व्ही. ए. खर्डे, डॉ. राजेंद्र सलालकर, विकास कोरडे, अशोक टकले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा मुसमाडे यांनी केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
