Breaking News

फसवणूक करणा-या चौघांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे,  कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.


वैशाली शेट्टी, र. भालचंद्र, मनोहर नाईक आणि अतुल ओझा, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या चौघांनी कंपनीतील कर्मचार्‍यांच्या वेतनातून जून 2017 ते ऑक्टोबर, 2017 या काळात भविष्य निर्वाह निधीची 19 लाख 7 हजार 485 ही रक्कम काढून घेतली. मात्र ती रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात भरलीच नाही. सदर रकमेची अफरातफरी करण्यात आली होती.