Breaking News

बहिणीने प्रेमविवाह केल्यामुळे तिच्या पतीची हत्या

ठाणे,  बहिणीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून उल्हासनगरमध्ये दोघा भावांनी बहिणीच्या पतीवर तलवार आणि चाकूने वार केले. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या रवींद्र लाडगे(28) यांच्यावर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. इरफान खान आणि सोनू खान हल्लेखोरांची नावे आहेत.


रवींद्र हा वीर तानाजी नगरमधील रहिवासी असून तो बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. आठ वर्षांपूर्वी अंबरनाथमधील खान कुटुंबातील एका मुस्लिम तरुणीशी त्यांचा प्रेमविवाह झाला. या विवाहाला खान कुटुंबाचा प्रचंड विरोध होता. तिच्या भावांमध्ये रवींद्र याच्याविषयी राग खदखदत होता. याच रागातून इरफान आणि सोनूने रवींद्र हल्ला केला.