Breaking News

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी बारा जणांना अटक


कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे. नऊ जणांना शिक्रापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार झाला होता. यात एका तरुणाचाही मृत्यू झाला होता. तर स्थानिकांचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी कोरेगाव -भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरीतून 12 जाणांना अटक केली आहे. यातील तिघे जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे.