Breaking News

‘धन विचार’ पुस्तक प्रकाशन उत्साहात


राहुरी प्रतिनिधी :- येथील वृत्तपत्र विक्रेते धनंजय पुरोहित यांनी संकलित केलेल्या सुविचारांचे ‘धन-विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. डॉ. जयंत कुलकर्णी, अनंत पुरोहित, अनिता पुरोहित, पत्रकार निसार सय्यद, संजय कुलकर्णी, भाऊसाहेब येवले आदी यावेळी उपस्थित होते. पुरोहित हे येथील शुक्लेश्‍वर चौकातील फलकावर २० वर्षांपासून नियमित सुविचार लिखाण करून प्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी संकलित केलेल्या सुविचार संग्रहातील निवडक सुविचारांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. पत्रकार निसार सय्यद हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. यावेळी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, पत्रकार विजय येवले, मुखतार सय्यद, डॉ. शुभा कुलकर्णी, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, मंजिरी जोशी, बाळासाहेब रासने, प्रसाद मैड, डॉ. शुभदा खरे, सुनिता बंड, कृष्णा ग्राफिक्सचे बाळकृष्ण वाघ, मारूती आरगडे, मालपाणी, राहुल तनपुरे, सुरेश सरोदे, संजु औटी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसंगम शिंदे यांनी केले. रामदास बोरूडे यांनी आभार मानले.