Breaking News

मैदानी खेळांत कोपरगावचे खेळाडू अव्वल : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- बेसबॉल हा खेळ अमेरिकेतील असला तरी आपल्या देशात विशेषत: महाराष्ट्रात या खेळाला उज्व्व्ल भविष्य आहे. या खेळात राष्ट्रीय पातळीवर कोपरगावचे खेळाडू चमकत आहे. कोपरगाव तालुक्याच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आहे. सर्व प्रकारच्या मैदानी खेळांत कोपरगावचे खेळाडू अव्वल आहेत, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. 
जिल्ह्याच्या वरिष्ठ बेसबॉल संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देताना ते बोलत होते. या खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी या टीमचे सदस्य समीर सुपेकर, अक्षय आव्हाड, पंकज नाईकवाडे, शुभम वदक, आशिष मेहेत्रे, अक्षय नाईकवाडे, कन्हैय्या गंगुले, गौरव आव्हाड, कुणाल गंगुले, प्रशांत शेणकर, तेजस कुलकर्णी, प्रवीण मुंगसे, शमित माळी, सुजित काशिद, अजिंक्य बोबडे, आकाश सुपारे, अहमदनगर जिल्हा बेसबॉल संघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, संघ व्यवस्थापक सुनील कुटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी आदी उपस्थित होते.