Breaking News

सुशोभिकरण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील गोदावरी पेट्रोलपंपाजवळील नाला सफाई करावी. या नाल्यावाटे दूषित पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकावेत. कोपरगाव शहरात सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत विविध ठिकाणी उद्याने विकसित करावीत. विविध ठिकाणी सुशोभिकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
यासंदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा दरेकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, की शहरातील प्रभाग दोनमधील वाहणारा नाला अनेक दिवसांपासून तुंबला आहे. त्यामुळे येथे डासांचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागांत आजार बळावण्यापूर्वी उपाययोजना कराव्यात. 

याप्रसंगी नवाज कुरेशी, राजेंद्र बोरावके, संदीप सावतडकर, रुपेश वाघचौरे, डॉ. अनिरुद्ध काळे, संदीप कपिले, विशाल निकम, मंगेश लोखंडे, जयेश हंसवाल, कुंदन भारंबे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.