बैतूल : मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील एका खाण दुर्घटनेत एक ११ वर्षीय मुलगी व तीन महिला ठार झाल्या, तर एक महिला जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. बैतूल शहरापासून ५० किमी अंतरावरील पाथाखेडा भागात 'वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड' या कंपनीने बंद केलेल्या सातपुडा खाण क्रमांक २ मध्ये काही महिला अवैध मार्गाने खोदकाम करताना ही घटना घडली. यात पायल देशमुख या मुलीसह चौघींचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डी. आर. तानीवार यांनी दिली.
खाण दुर्घटनेत चौघी ठार.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:46
Rating: 5