Breaking News

पीडीपी नेत्याचा राजीनामा.


जम्मू : जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षा(पीडीपी)चे नेते चौधरी जफर अली खाटना यांनी या पक्षात सर्वाधिक भ्रष्ट लोक असल्याचा आरोप करत रविवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम दिल्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली. पीडीपी पक्षाचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षातून बाहेर पडताना चौधरी जफर म्हणाले की, पीडीपीने मुफ्ती मोहम्मद यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने हा पक्ष भ्रष्टाचारी लोकांचा अड्डा झाला आहे.