नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेल्या १४७ भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानने रविवारी सुटका केली आहे. कराचीस्थित मलीर कारागृहातून ८ महिन्यांनतर सुटका झालेल्या या मच्छीमारांना भारताकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मच्छीमारांना कराचीवरून एक्स्प्रेसने लाहोर येथे आणण्यात आले आहे. हे मच्छीमार भारतात दाखल होईपर्यंत त्यांना सुरक्षा प्रदान केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या सुटकेनंतरही पाकच्या मलीर कारागृहात अजून २६२ भारतीय मच्छीमार कैद आहेत.
पाककडून १४७ भारतीय मच्छीमारांची सुटका.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:45
Rating: 5