Breaking News

विना चर्चेचे कायदे करून अंमलात आणणे लोकशाहीला घातक: अण्णा हजारे


पाथर्डी/प्रतिनिधी/- विना चर्चेचे कायदे करणे, ते अंमलात आणणे हे सुद्धा लोकशाहीला घातक आहे. प्रबळ विरोधी पक्ष नाही, चुकून विरोधक बोलले तर प्रभाव पडत नाही. कारण ते चुका करून बसलेत त्याची वाच्यता होण्याची भीती वाटते. लोकप्रश्ना बरोबरच देशासाठी आपण तीन वेळा तुरुंगात होतो. त्या तीनही वेळेस सरकार पडले. असे वक्तव्य जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत केले. 
बर्ड संस्थेमार्फत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त "प्रेरणा २०१८" कार्यक्रमांतर्गत व्याख्यानमालेत बोलण्यासाठी जेष्ठ समाजसेवक जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवार,१२ जानेवारीच्या रात्री पाथर्डीत आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. 

देशातील न्यायव्यवस्था हि सर्वोच्च व्यवस्था असून न्यायालयाचे कामकाज संविधानाप्रमाणे चालते. देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्यायालयीन कामकाज व्यवस्थित चालत नसल्याबाबत पत्रकार परिषद घेवून जनतेसमोर मांडले. ही गोष्ट लोकशाहीसाठी चिंताजनक असुन लोकशाहीला धोका निर्माण होत आहे. लोकशाहीला धोका होत असेल तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व लोकशाही देशाच्या देशभक्तांनी दिलेले बलिदान वाया जाते. आज पर्यत न्यायपालिकेत असे अनेक प्रकार झाले असतील. परंतु ते लोकासमोर आले नाहीत परंतु आज चार न्यायाधीशांनी धाडसानी लोकासमोर जे काही वास्तव मांडल त्या बाबत त्याचं कौतुकच केले पाहिजे. परंतु लोकशाही अबाधित राहण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे. तर पत्रकारांवर दाखल होत असलेल्या खोट्या गुन्हा बदल विचारले असता अण्णा म्हटले की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तभ असून लोकशाही अबाधित राहण्यासाठी पत्रकारांना संरक्षण मिळालेच पाहिजे, सत्य लिहून पोलिसांचे व प्रशासनाचे गैरप्रकार व भ्रष्ट्राचार जनते समोर मांडणाऱ्या पत्रकारांचा आवाज दडपण्यासाठी पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून सत्याचा आवाज दडपणे म्हणजे लोकशाहीची गळा घोटण्याचा प्रकार आहे. अशी कृती भारतीय लोकशाहीला सर्वात मोठा धोका असून, याला वेळीच पायबंद घातला पाहिजे असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.