Breaking News

ग्रामीण मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी महत्वाची :डॉ.कुमार सप्तर्षी


कुळधरण/प्रतिनिधी/- ग्रामीण भागातील मुली शिकत नाहीत.अंधश्रद्धा,बालविवाह अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खेड येथे शैक्षणिक प्रकल्पाची उभारणी केली. लवकरच विविध व्यावसायिक कोर्सेसही सुरु केले जातील. विशेषतः ग्रामीण मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी महत्वाची असल्याने कार्य सुरु ठेवले आहे. मुलगी शिकली तर कुटुंब संस्कारित होते. सध्या विद्यालयात ६७ टक्के मुलींचे प्रमाण आहे हे प्रयत्नांचे यश आहे असे वक्तव्य जेष्ठ विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले
लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे, पुणे येथील भुमापन विभागाचे अधिकारी नानासाहेब कांबळे, पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे, कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा प्रवक्ते विकास लवांडे, प्राचार्य चंद्रकांत मोरे, डॉ.एन.बी.मुदनुर,गोरख मोरे, माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे, बाळासाहेब काळे, मारुती सायकर, निलेश दिवटे, मच्छिंद्र अनारसे, सुभाष माळवे, आशिष बोरा, नवनाथ जांभळकर, राजेंद्र साके, वायसेवाडीचे सरपंच नवनाथ पवळ, महादेव मोरे, भिमदेव जंजिरे, धनंजय खंडागळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. 

प्राचार्य चंद्रकांत मोरे यांनी प्रास्ताविक केले. विकास लवांडे, अंकुश जंजिरे, नानासाहेब कांबळे, बाळासाहेब साळुंके, निलेश दिवटे यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन प्रा.किरण जगताप यांनी केले. माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब मोरे यांनी आभार मानले.

पारितोषिक वितरण समारंभानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या सादरीकरणाला खेड पंचक्रोशीतील पालक,विद्यार्थी,महिलांनी चांगलीच दाद दिली.

◾पत्रकारांकडुन डॉ.सप्तर्षी यांचा सत्कार

परखड लेखणी व राजकीय विश्लेषणातुन महाराष्ट्रात पत्रकारितेचा ठसा उमटविणारे डॉ.कुमार सप्तर्षी यांचा कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी विशेष सत्कार केला. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र अनारसे, तालुकाध्यक्ष सुभाष माळवे, आशिष बोरा, निलेश दिवटे, प्रा.सोमनाथ गोडसे, दत्ता उकिरडे, विश्वास रेणुकर, प्रा.राहुल ढवाण, दिलीप अनारसे, नामदेव फरांडे, प्रा.किरण जगताप आदी पत्रकारांनी हा सत्कार केला. राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार मिळाल्याबद्दल माहीजळगाव येथील पत्रकार निलेश दिवटे यांचा डॉ.कुमार सप्तर्षी यांनी सत्कार केला.