Breaking News

मदरशांतून सनदी अधिकारी घडतात!.


नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिजवी यांचे मदरशांसदर्भातील वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सय्यद गैयुरूल हसन रिजवी यांनी फेटाळून लावले आहे. मदरशांचा संबंध दहशतवादाशी जोडणे हास्यापद आहे. मदरशातून शिक्षण घेणारी मुले आयएएस अधिकाऱ्यापर्यंत झेप घेतात, असे रिजवी रविवारी म्हणाले. काही दिवसांपूर्वी वसीम यांनी मदरशांतून दहशतवादाला चालना मिळत असल्याचा आरोप लावत त्यांना बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविले होते.