कर्जत येथे क्रीडा अकादमीसाठी दहा कोटींचा निधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामीण भागातून चांगले खेळाडू तयार व्हावेत यादृष्टीने कर्जत येथे क्रीडा अकादमी उभारण्याकरीता दहा कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.कर्जत येथे गोदड महाराज क्रीडानगरीत शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०१७-१८ च्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला पालकमंत्री प्रा.राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, विनायक मेटे, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, नारायण कुचे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, क्रीडा उपसंचालक विजय संतान आदी उपस्थित होते.
श्री.फडणवीस म्हणाले, कबड्डी हा भारताच्या मातीत रुजलेला खेळ असून ती जगाला भारताने दिलेली देणगी आहे. ग्रामीण भागात या खेळाला विशेष प्रतिसाद मिळतो. कर्जत येथील स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे. या प्रतिसादावरुन नागरिकांचे क्रीडाप्रेम दिसून येते. या भागातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी कर्जत येथे क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.