Breaking News

रणजी विजेत्या विदर्भाच्या संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन


बलाढ्य दिल्ली संघाचा पराभव करून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या विदर्भाच्या संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाच्या संघाने या करंडकावर आपले नाव कोरले आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या संपूर्ण स्पर्धेत विदर्भाच्या संघातील खेळाडूंनी सांघिक भावनेने केलेला खेळ सफल ठरला असून त्यांनी नवा इतिहास घडविला आहे.