Breaking News

चित्रपटगृहांना आज पोलीस संरक्षण


मुंबई : मुंबईतील 140 चित्रपटगृहांमध्ये आज पद्मावत चित्रपट प्रदर्शित होतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या चित्रपटगृहांवर पोलीस तैनात करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर हा चित्रपट प्रदर्शित होत असून चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी चित्रपटगृहांच्या मालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईत हिंसाचार पसरविणार्‍या व्यक्तीची किंवा संस्थेची गय करणार नाही, असेही मुंबई पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त देवेन भारती यांनी म्हटले आहे. चित्रपटगृहांना संरक्षण मिळावे, जेणेकरून जर आणीबाणीचा प्रसंग ओढवला तर त्वरित तो नियंत्रणात आणता येईल. यासाठी चित्रपटगृहांच्या मालकांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे, अशी माहिती चित्रपट मालक आणि वितरक संघटनेचे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिली आहे.