Breaking News

श्रमसाफल्य पुरस्काराने रंगनाथ पंडित सन्मानीत


नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते रंगनाथ पंडित यांना श्रमसाफल्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भानसहिवरा ( ता. नेवासा ) येथील सावता महाराज प्रतिष्ठाण व सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा वृत्तपत्र क्षेत्रातील श्रमसाफल्य पुरस्कार कुकाणा येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते रंगनाथ गंगाराम पंडित यांना अर्थतज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दरदंले होते. सन्मान चिन्ह, फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेवासा तालुकाध्यक्ष संजय सुखदान, समर्पन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण घुले, मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, तरवडी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना नेते बाळासाहेब पवार, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक पेहरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कुकाणा येथील रंगनाथ पंडित यांनी आपला सलून व्यवसाय सांभाळून सन 1982 मध्ये भारत न्युज पेपर एजन्सी या नावाने पेपर एजन्सी सुरू केली. मुलांच्या सहाय्याने त्यांनी 35 वर्षात उन, वारा, पाऊस या तिनही ऋतुत वाचकांना त्यांनी अखंडीत सेवा दिली. आजही ते या व्यवसायात विनम्र पणे ग्राहकांना सेवा देतात. यावेळी नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, नेवासा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक सुखदेव फुलारी, नेवासा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुनिल पंडित, बाळासाहेब पुरोहित, किशोर भंडारी, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर खंडागळे, रख्माजी लिपणे, कुकाण्याचे वृत्तपत्र विक्रेते भारत पंडित, सुनिल कर्डीले, सोमनाथ कचरे, दत्तात्रय मुरकुटे, ऋषीकेश पंडित, शिवम् पंडितसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन ज्ञानेश्‍वर जाधव आणि सुधीर चव्हाण यांनी तर पत्रकार सुनिल पंडित यांनी आभार मानले.