राज्यातला पोलिसांचा पहिला पेट्रोल पंप सिंधुदुर्गात जनतेसाठी खुला
सिंधुदुर्गनगरी, दि. 20, जानेवारी - सिंधुदुर्ग पोलिस कल्याण निधी सहाय्यार्थ उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग पोलिस दलाचा पेट्रोल पंप पोलीस दलाबरोबरच लोकांसाठी खुला क रण्यात आला आहे. याच उद्घाटन आज सकाळी सिंधुदुर्गनगरीत जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते झाल. निर्भेळ आणि प्रामाणिक सेवेची ग्वाही जिल्हा पो लिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यानी यावेळी दिली. राज्यातला अशा प्रकारचा पहिलाच पेट्रोल पंप आहे.
सिंधुदुर्ग पोलिस कल्याण निधी सहाय्यार्थ उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सिंधुदुर्गनगरीत जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते झाले. पूर्ण राज्यात अश्या 38 पेट्रोल पंपना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गमधला पेट्रोल पंप सर्वात प्रथम पूर्ण होऊन कार्यान्वित झाला ही गर्वाची बाब आहे. या पेट ्रोल पंपाच काम लवकर पूर्ण होण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे सब इन्स्पेक्टर संजय कातीवले यानी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यानी पुष्पगुच्छ देत त्याचं विशेष कौतुक केल. या पेट्रोल पंपाच काम पूर्ण पारदर्शक असेल, येथे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही अशी ग्वाही पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.