पैठणमध्ये राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात भव्य मिरवणुकीने परिसर गजबजला
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात ‘जिजाऊ वंदना’ घेऊन करण्यात आली. यावेळी आ. भुमरे,नगराध्यक्ष लोळगे, प्रा. हंसराज जाधव, अर्जून खराद आदींची भाषणे झाली. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत श्रीनाथ हायस्कूल, कन्या प्रशाला, जि. प. मुलांची शाळा, सनब्राईट इंग्लिश स्कुल, संत तुकाराम इंग्लिश स्कूल, आर्य चाणक्य विद्या मंदीर, हिंद स्काॅलर अकॅडमी, गुरुकुल इंग्लिश स्कुल, आयकाॅन पॅराडाईज इंग्लिश स्कुल, जैन इंग्लिश स्कुल आदी शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
शालेय विद्यार्थी या मिरवणुकीत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले व मावळ्याच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. यावेळी तुषार पाटील, बजरंग लिंबोरे, भुषण कावसानकर, बाळु माने, संतोष सव्वासे, आबासाहेब बरकसे,शेखर शिंदे, किशोर सदावर्ते, आतीष गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, भगवान निवारे, माऊली मुळे, बाबुराव पडुळे, राजुभाऊ गायकवाड, हरिभाऊ शेळके, कपिल चव्हाण, गणेश पवार, गणेश गिरी, आदिल शेख, विशाल काळे, कृष्णा तावरे, शहादेव लोहारे, रोहीत भोपळे, आशिष मापारी, संभाजी काटे, संजय मोरे, गणेश मडके, महेश पवार, नाना शेंबडे, किशोर चौधरी, राजु मापारी, निवृत्ती मापारी, शिवाजी पठाडे, अशोक बर्डे, संतोष गव्हाणे, सतीश पल्लोड, दिलिप मगर, नाथ पोरवाल, डाॅ. पंडीत किल्लारीकर, संतोष खोबरे आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा मापारी यांनी केले. तुषार पाटील यांनी आभार मानले.
