आ. डॉ. तांबेंचा वाढदिवस पुस्तक मैत्रीदिनाने साजरा होणार
आ. डॉ. तांबे यांचा वाढदिवस बुधवारी {दि. १७} आहे. या पार्श्वभूमीवर जयहिंद युवा मंचच्यावतीने एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, की आ. तांबे यांनी नगराध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ते विधानपरिषद सदस्य या काळात निरोगी समाज निर्मितीचे कार्य हाती घेतले. आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून राज्यभर युवकांची मोठी फळी निर्माण केली. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले. अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम केले. नेता नव्हे मित्र अशी ओळख आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी निर्माण केली. म्हणून पुस्तकप्रेमी असलेले आ. डॉ. तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
