Breaking News

डॉ. अब्दुल कलाम विद्यार्थी मंचतर्फे स्व. थोरात यांची जयंती उत्साहात


संगमनेर प्रतिनिधी : -येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी मंचच्यावतीने स्व. भाऊसाहेब थोरात यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या हस्ते यानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.जोर्वे येथील समता विद्या मंदिर विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी सरपंच रविंद्र खैरे, मुख्याध्यापक प्रकाश खेमनर, पर्यवेक्षक भवर, रामदास काकड, शिवाजी काकड, मंचचे सत्यजीत थोरात, डॉ. पवन काकड, अमित थोरात, विशाल बोरकर, अभिनव थोरात, बंटी यादव, दिपक बारे, प्रकाश काकड, अनिल क्षिरसागर, अमोल दिघे, अमोल क्षिरसागर, अमित गुंजाळ आदी उपस्थित होते.