Breaking News

‘प्रवरा’च्या शोधाची नोंद भारत सरकारकडे


प्रवरानगर प्रतिनिधी  :- प्रवरा ग्रामीण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थांनी एक नाविन्यपूर्ण शोध लावला आहे. सध्या वापरात असलेल्या पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागते. यात शेतकऱ्यांचा बराच वेळ व पैसा खर्च होतो. त्या अडचणी कमी व्हाव्यात, या उद्दिष्टाने एक नवीन पद्धतीचे व वापरायला अगदी सोयीस्कर असे पेरणी यंत्र मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. या शोधाची नोंद भारत सरकारच्या मुंबई पेटंट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली.
यामध्ये हृषीकेश अहिरे, विशाल ढगे, निवृत्ती गायकवाड आणि हृषिकेश आल्हाट यांनी भाग घेतला. यासाठी या विभागाचे प्रा. मिलिंद गुळवे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. आर. आर. खर्डे यांच्या हस्ते विद्यार्थांचा करण्यात आला. या नाविन्यपूर्ण शोधाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हसे, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, सुजय विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक संचालक प्रा. शरद रोकडे, उपप्राचार्य प्रा. विजयकुमार राठी व मेकॅनिकल इंजिनिरिंग विभागाचे प्राध्यापकांनी कौतूक केले.