Breaking News

उच्च न्यायालय सेवा केंद्राच्या ऐंशी लाखाच्या दरोड्याची विजयी शैली


मुंबई/विशेष प्रतिनिधी : शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शाखा अभियंता विजय बापट कृत उच्च न्यायालय सेवा केंद्रातील 80 लाख भंगार दरोडा प्रकरण साबांतील भ्रष्टाचाराचा कळस मानला जात आहे. या दरोडेखोरीचा गोपनीय अहवाल उपअभियंता शशीकांत घाडगे यांनी 6 जानेवारी रोजी तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुषमा गायकवाड यांना पाठविला असल्याचे अधिकृत आहे.
मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या शहर इलाखा विभागाच्या उच्च न्यायालय सेवा केंद्राचे भंगार चोरून विकल्याचा संशय शाखा अभियंता विजय बापट यांच्यावर व्यक्त केला जात आहे. सलग दोन दिवस शासकीय सुट्या असल्याची संधी साधून शाखा अभियंता विजय बापट यांनी तब्बल 80 लाखाचे उच्च न्यायालय सेवा केंद्राचे भंगार परस्पर विकल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर या दरोडेखोरीचा उलगडा झाला. त्यानंतर आ. चरणभाऊ वाघमारे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रयत्न सुरू करून साबां प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, त्यानंतर खर्‍या अर्थाने या प्रकरणाला वाचा फुटली.
हा प्रकार कसा घडला, या प्रकरणाचा सुत्रधार कोण आहे, या ठिकाणी कार्यरत असलेले शाखा अभियंता विजय बापट यांची भुमिका काय होती या संदर्भाचा गोपनीय अहवाल उपअभियंता शशीकांत घाडगे यांनी(जा.क्र.1/2018) 6 जानेवारी 2018 रोजी तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुषमा गायकवाड यांना सादर केला असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर साबां प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत शाखा अभियंता विजय बापट यांचा खुलासा संयुक्तीक नाही, उच्च न्यायालय आणि सेवा केंद्र यांच्याकडील पञव्यवहारावरून जवळपास एक ट्रक माल बाहेर गेल्याचा अंदाज या गोपनिय अहवालात नमुद आहे(क्रमशः)