Breaking News

प्रसार लिटील वंडर्स स्कुलचे यश


नगर ता. प्रतिनिधी-  येथील शांतीनिकेतन संकुलात जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाड सामान्यज्ञान परिक्षेत लिटील वंडर्स अँड विजड्म हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शांतीनिकेतन संकुलात शिक्षण घेणारे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड संस्थेने आयोजित केलेल्या परिक्षेत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. नवले सिध्दी निवृत्ति, हारेर समृद्धि सोमनाथ, बेरड स्वराज संतोष, जोशी दिव्या हरिदास या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. परिक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या संचालिका स्वाती चेमटे यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दुबे, शिक्षीका कल्पना वड्डेपल्ली, लुबना गझल शेख यांच्यासह सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जेऊरचे सरपंच मधुकर मगर, उपसरपंच व बंडू पवार यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.