Breaking News

तरूणाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून एक लाखाचा ऐवज ,लंपास

जळगाव, दि. 22, जानेवारी - पाचोरा ते भडगाव रोडवर ऑनलाईन शॉपिंगची डिलिवरी करणार्‍या तरुणास डोळ्यात मिरचीची पूड फेकून मारहाण करत त्याच्या जवळील 64 हजारांची रोकड व सुमारे 32 हजार रुपयांचे 9 पार्सल व मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहन चालकांच्या मनात धडकी भरली आहे.


पाचोरा येथे डिलेवरी प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय असून चंद्रकांत पाटील हे कार्यालय प्रमुख आहेत. तर येथील आठवडे बाजार बाजारात राहणारा आशिष पटवारी वय 34 हा युवक या कार्यालयामार्फत ऑनलाइन शॉपिंगचे पार्सल डिलेवरी करण्याचे काम करतो. 40 पार्सल घेऊन भडगाव येथे गेला. त्याने 31 पार्सल देऊन ग्राहकांकडून 64 हजार 473रूपये घेतले. ही देवाणघेवाण त्याने भडगाव बस स्थानकावर केली व दिवसभराचे कामकाज आटोपून तो आपली मोटारसायकल क्रमांक एम एच 19बी ई 8811ने पाचोर्‍या क डे निघाला. बांबरूड फाट्याजवळ तितुर नदीच्या पुलावरून जात असताना त्याच्यामागून दोन मोटारसायकलवर आलेल्या सहा युवकांनी त्याला आमचेही पार्सल देवुन टाका असे म्हणत त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो थांबला नाही, तेव्हा त्याच्या मोटार सायकल पुढे तिघांनी आपली मोटारसायकल लावली व त्यास थांबवले त्याच्या मागून आलेल्या मोटारसायकलवरील तिघांपैकी एकाने त्याच्या तोंडावर लाल मिरचीची पूड घेतली.त्यामुळे तो भांबावला तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या युवकांपैकी दोघांनी त्यास नदी पुलाखाली सुमारे 50 फुट खोल 2ओढत नेले. त्यास लाथाबुक्क्यांनी व केबलने मारहाण केली व त्याच्या जवळील 64 हजार 473 रूपयांची रोकड व उरलेले 9 पार्सल किंमत सुमारे 32 हजार असा सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला. हे युवक नदीतूनच पुढे मार्गस्थ झाले. जखमी झालेल्या आशिष पटवारी याने कसेतरी रस्त्यावर येऊन ये-जा क रणार्‍यांना थांबवत आपबिती सांगितली. हा प्रकार पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली व लुटारूंचा माग काढण्याचा प्रयत्न केला. गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते हा प्रकार कळताच शहरातील व्यापारी बांधवांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारामुळे रात्री-बेरात्री मोटार सायकलवरून ये - जा करणार्‍यांच्या मनात धडकी भरली आहे.