Breaking News

रिफायनरी विरोधासाठी एकजूट दाखवा - खा. विनायक राऊत

सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - शनिवारी सायंकाळी गिर्येत शिवसेनेची रिफायनरी विरोधात तोफ धडकली. गिर्ये ग्रामपंचायती समोर असलेल्या पटांगणात रिफायनरी विरोधातील जाहीर सभेत शिवसेनेने प्रकल्पाबाबतची सडेतोड भूमिका व विरोधकांनी केलेल्या आरोपांचा खरपूस खरपूस समाचार घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शिवसेनेच्या रिफायनरी विरोधातील जाहीर सभेस सुरुवात झाली.


खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले, केंद्र सरकारने केवळ अदानी साठी या रिफायणारीच्या घाट घातला आहे. गिर्येत केवळ रिफायनरीच नव्हे तर क्रूड आ ॅइल टर्मिनल होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांचा विरोध रिफायनरी प्रकल्पाबाबरोरच क्रूड ऑइल टर्मिनल ला असला पाहिजे. गिर्ये व रामेश्‍वर गावातील ग्रामपंचायतीबरोबर राजापूर मधील ग्रामपंचायतींनी देखील येत्या 26 जानेवारीला ग्रामसभेत रिफायनरी विरोधात एकमताने ठराव घेऊन त्याबाबतचे असहमती पत्र आपणास द्यावे. ही सर्व पत्रे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करून प्रकल्पाला असलेला स्थनिकांचा विरोध यातून दाखवून देणार आहोत. केवळ शहा कुटुंबीयांचा भल व्हावं याकरता या प्रकल्पातून कोकणची राख करून त्या राखेची रांगोळी गुजरात मध्ये घालण्यासाठी हा प्रकल्प आणला जात आहे, असे सांगून अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. रिफायनरी बाबतच्या सडेतोड भूमिकेबरोबरच स्वार्थीपणा हा शिवसेनेचा धंदा नसून मंत्रिपदासाठी प्रकल्पाबाबत तडजोड करायची आणि मंत्रिपद मिळत नसेल तर प्रकल्पाला विरोध करायचा. प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करणारे दलाल हे शिवसेनेचे नसून विरोधकांचेच आहेत. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या शिवसेनेवरील टीकेचा खरपूस समाचार घेतला.