Breaking News

जंगली हत्तींच्या हल्ल्यात मायलेकाचा मृत्यू .


कोरबा : छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात जंगली हत्तींनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेसह तिचा मुलगा मारला गेला. अतोरी बेल्सोटा गावातील एक व्यक्ती पत्नी, मुलांसह शनिवारी नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होता. करसी व धंदापुरी या गावांदरम्यान संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर त्यांच्यासमोर अचानक जंगली हत्तींचा कळप आला. हत्तींना पाहून हे कुटुंब आपले वाहन सोडून पळाले. मात्र, ३० वर्षीय गीता व तिचा सात वर्षांचा मुलगा या हत्तींच्या कचाट्यात सापडले. हत्तींनी या मायलेकाला चिरडून ठार मारले. सुदैवाने या महिलेचा पती आणि दुसरा मुलगा तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले.