वाळू लिलावातून प्रशासनाने जमा केला 8 कोटी रूपयांचा महसूल !
परभणी, परभणी जिल्ह्यात वाळू लिलावातून प्रशासनाने 8 कोटी 95 लाख 39 हजार 258 रुपयांचा महसूल जमा केल्याचे वृत्त मिळत आहे. जिल्ह्यातील 42 वाळू घाटांपैकी पहिल्या फेरीमध्ये 10 घाटांचा लिलाव पूर्ण झाला असून यामधूनच हा महसूल जमा करण्यात आला आहे.
गोदावरी, पूर्णा आणि दूधना नदी काठावरील वाळू घाटांचे लिलाव करून प्रशासन वाळू उपसा करण्यास परवानगी देते. दरवर्षी या लिलावामधून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. यावर्षी देखील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. परभणी जिल्ह्यातील 42 आणि परभणी - हिंगोली जिल्ह्यातील संयुक्त 5 अशा 47 वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रशासनाने ठेकेदारांकडून निविदा मागविल्या होत्या. प्राप्त झालेल्या निविदांचा लिलाव करण्यात आला.