Breaking News

कुष्ठरुग्णांच्या चांगल्या सोयी सुविधांसाठी प्रयत्न करणार - डॉ. रणजित पाटील


कुष्ठरुग्णांना शतकाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या वडाळा येथील अॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालयाला नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेच्या व्यवस्थेबाबत त्यांनी पाहणी केली व रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या.प्रशासनाच्या सहाय्याने रुग्णालयातील कुष्ठरुग्णांसाठी चांगल्या सुविधा व भविष्यात चांगले जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयात ३० ते ४० वर्षांपासून दाखल असलेल्या कुष्ठरुग्णांना रुग्णालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या औषधोपचाराबाबत माहिती घेऊन रुग्णांच्या व्यथा मंत्र्यांनी जाणून घेतल्या.