नवीन ३० बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करणार - डॉ. दीपक सावंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ दि.१ ऑगस्ट २०१७ रोजी करण्यात आला. ही सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून विविध स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. अरुंद रस्ते, रेल्वे स्थानकालगतचा परिसर याठिकाणाहून बाईक ऍम्ब्युलन्सच्या सेवेसाठी कॉल मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आतापर्यंत १३०२ रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे. ही मोफत सेवा असून १०८ याक्रमांकावर उपलब्ध आहे.
अरुंद रस्ते व डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणे अशक्य आहे त्या ठिकाणी या बाईक अॅम्ब्युलन्सने सहजरित्या पोहोचणे शक्य आहे. याचा विचार करून राज्यातील पालघर,जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट अशा दुर्गम भागात २० बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवा सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
